| लग्नगाठसाठी नाव नोंदविताना....... |
लग्नगाठ हे काय आहे?
लग्नगाठ ही इसकाळ.कॉमतर्फे आपल्याला दिली जाणारी एक अत्याधुनिक सेवा आहे. अगदी कमी
शुल्क आकारून. ही सुविधा म्हणजे आपल्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळांच्या शोधाचे कष्ट,
वेळ आणि खर्च कमी करण्यासाठीचे माध्यम नवे, मध्यस्थ नव्हे!
कष्ट, वेळ आणि खर्च कमी कसे काय होणार?
लग्नगाठमार्फत आपण आपल्या उपवर मुलाची / मुलीची माहिती इंटरनेटवर देतो म्हणजे जगभरात
कुठेही ही माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. तसेच अपेक्षित वर / वधुची माहिती जगभरातुन
कुठूनही आपल्यालाही मिळवता येते. (फक्त नोंदणीकृत सभासदांनाच)
ही माहिती घरातील सर्व मंडळी एकाच वेळी, अनेक ठिकाणी पाहू शकतात किंवा आपल्या सोयीनुसार,
वेळेनुसार पाहू शकतात. ही माहिती इंग्रजी आणि मराठी (लवकरच) या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध
असून या माहितीचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. जास्तीत
जास्त जाती, पोटजाती, सर्व प्रकारच्या लोकांना लग्नगाठकडे आपली माहिती पाठवता येईल
व अपेक्षित वधु-वरांची माहिती मिळवता येईल.
लग्नगाठमुळे स्थळांच्या शोधासाठी प्रत्यक्ष घरी जाणे, प्राथमिक माहिती काढणे यात वेळ
आणि पैसे वाचू शकतात. तसेच काही अवघड प्रश्न प्रत्यक्ष विचारणे कठीण जाते, जे इथे इंटरनेटवर
सहज शक्य होते. तसेच पत्रिका आणि फोटो यांच्या प्रटी काढणे, पोष्ट करणे, कुरियर करणे
हे सगळे लग्नगाठमुळे वचणार आहे आणि आता इतकी सारी माहिती, इतके पर्याय उपलब्ध असल्याने
कोणत्या इच्छित स्थळाला घरी चहा-पोह्याला बोलवायचे हे ही आपल्या हातात असेल....
याचा फॉर्म....?
खालील प्रकारे फॉर्म भरून तुम्ही नाव नोंदवू शकता..
* प्रत्यक्ष सकाळ कार्यालयात येऊन...
* ऑनलाईन फॉर्म भरून...
हा फॉर्म कोण भरू शकतो?
प्रत्यक्ष उपवर मुला / मुलीची माहिती ते स्वतः किंवा त्यांचे कुणीही नातेवाईक हा फॉर्म
भरू शकतात. पूर्णपणे भरलेला फॉर्म आवश्यक बाबींसह सकाळ पेपर्स लिमिटेड, 595, बुधवार
पेठ, पुणे- 411002 येथे प्रत्यक्ष आणून देऊ शकता किंवा कुरियर वा पोष्टाने पाठवू शकता.
नावनोंदणी पूर्ण होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
* उपवर मुलाचा / मुलीचा 4 x 6 आकाराचा / पोस्टकार्ड साईज फोटो.
* इमेल आयडी * उपवर मुलाचा / मुलीचा रेसिडेन्स व आयडेन्टीटी प्रुफ (ड्रायव्हींग लायसेन्स,
पासपोर्ट, मतदार कार्ड)
* उपवर मुलाच्या / मुलीच्या दोन परिचितांची नाव, पत्ते, फोन नंबर
* रू. 300/- वार्षिक नावनोंदणी फी.
मग स्थळ कशी शोधणार?
तुम्हाला लॉगइन आयडी व पासवर्ड एका आठवड्यामध्ये ई-मेलद्वारे कळविला जाईल. आपल्या या
आयडी व पासवर्ड वापरून आपण अपेक्षित स्थळ शोधू शकाल. साधारणतः एका आठवड्यात ही माहिती
साईटवर उपलब्ध होईल. तेव्हा आताच फॉर्म भरून लग्नाच्या तयारीला लागा.
अधिक माहितीसाठी संपर्कः
लग्नगाठ.कॉम,
सकाळ पेपर्स लिमीटेड,
दुसरा मजला,
595, बुधवार पेठ,
पुणे- 411002.
फोन नं. : 020- 24405946.
इ-मेल : lagnagaath@esakal.com
|
|
|
|