Lagnagaath
Home  | Member Login | Register | Membership Options | Matrimonial Tips | Matri Special | About Us | Premarital Councelling | Classifieds|
लग्नगाठ हे काय आहे? 

"लग्नगाठ' ही इसकाळ.कॉम तर्फे आपल्याला दिली जाणारी एक अत्याधुनिक सुविधा आहे, तेही अगदी कमी शुल्क आकारून. ही सुविधा म्हणजे आपल्या उपवर मुला-मुलींसाठीस्थळांच्या शोधाचे कष्ट, वेळ आणि खर्च कमी करण्यासाठीचे माध्यम नवे, मध्यस्थ नव्हे! कष्ट, वेळ आणि खर्च कमी कसा काय होणार? लग्नगाठ मार्फत आणि आपल्या उपवर मुलाची / मुलीची माहिती इंटरनेटवर देतो म्हणजे जगभरात कुठेही ही माहिती सहजगत्या उपलब्ध होउ शकते. तसेच अपेक्षित वर / वधुंची माहिती जगभरातुन कुठूनही आपल्यालाही मिळवता येते. (फक्‍त नोंदणीकृ त सभासदांनाच)ही माहिती घरातील सर्व मंडळी एकाचवेळी,अनेक ठिकाणी पाहू शकतात किंवा आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार पाहू शकतात.ही माहिती मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून या माहितीचा कोणीही गैरवापर करु शकणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. जास्तीत जास्त जाती,पोटजाती, धर्म, वंश, सर्व प्रकारच्या लोकांना "लग्नगाठ "कडे आपली माहिती पाठविता येईल व अपेक्षित वधु-वरांची माहिती मिळविता येईल. "लग्नगाठ" मुळे स्थळांच्या शोधासाठी प्रत्यक्ष घरी जाणे, माहिती काढणे यात वेळ आणि पैसे वाचू शकतात. तसेच काही अवघड प्रश्न, प्रत्यक्ष विचारणे जरा अवघडच जातं जे इथे इंटरनेटवर सहज शक्‍य होते. तसेच पत्रिका आणि फोटो यांच्या प्रती काढणे, पोस्ट करणे, कुरियर करणे हे सगळं "लग्नगाठ"मुळे वाचणार आहे आणि आता इतकी माहिती,इतके पर्याय उपलब्ध असल्याने कोणत्या इच्छित स्थळाला घरी चहा-पोह्याला बोलवायचं हे ही आपल्या हातात असेल. याचा फॉर्म....?
खालील प्रकारे फॉर्म भरून तुम्ही नाव नोंदवू शकाल. * प्रत्यक्ष "सकाळ' कार्यालयात येउन * फॉर्म डाउनलोड करुन * ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे
प्रत्यक्ष उपवर मुला / मुलीची माहिती ते स्वत: किंवा त्यांचे कुणीही नातेवाईक हा फॉर्म भरु शकतात. पूर्णपणे भरलेला फॉर्म नजीकच्या सकाळ कार्यालयात आणून द्यावा किंवा तुम्ही तो पोस्ट किंवा कुरिअरने पाठवून देऊ शकता. नाव नोंदणी पूर्ण होण्यासाठी या फॉर्मसोबत उपवर मुलाचा / मुलीचा पोस्टकार्ड साईज किंवा 4" x 6" साईजचा रंगीत फोटो (आयकार्ड / पासपोर्ट साईझ फोटो नाही), इमेल ऍड्रेस आणि रू. 300/- (वार्षिक रजिस्ट्रेशन फी)चा सकाळ पेपर्स लिमिटेड या नावावर काढलेला व पुणे येथे वटणारा डी.डी. आवश्‍यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनकरिता डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पैसे भरू शकता. ऑनलाईन पेमेंटकरिता 350 रू. वार्षिक नोंदणीचे चार्जेस आहेत. स्थळ कशी शोधणार? आपली माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि आपली नोंदणी फी प्रत्यक्षात जमा झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात आपली माहिती लग्नगाठच्या साईटवर उपलब्ध करून दिली जाईल आणि साईटवर लॉगीन करण्याकरिता आपणांस एक मेंबर आयडी व पासवर्ड आपल्या इमेल आयडीवर पाठविला जाईल. हा मेंबर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण साईटवर स्थळांची संपुर्ण माहिता बघू शकाल आणि अपेक्षित स्थळांशी संपर्क साधू शकाल. तेव्हा आता लगेचच फॉर्म भरून लग्नाच्या तयारीला लागा.
संपर्क : lagnagaath@esakal.com
लग्नगाठ साठी संपर्काचा पत्ता:- लग्नगाठ..कॉम, दुसरा मजला, सकाळ पेपर्स लि., 595 बुधवार पेठ, पुणे - 2. फोन नं. 020-24405946 / 020-24405945
Font Proble? Click here
View in Marathi
 
150 x 600 Banner
© 2006, esakal.com, All Rights Reserved Best viewed with 1024x768 Resolution Terms of Service | Disclaimer | Privacy Statement